‘हमिदाबाईची कोठी’ नाटक 26 फेब्रुवारीला रंगभूमीवर

February 18, 2011 1:05 PM0 commentsViews: 13

18 फेब्रुवारी

सुनिल बर्वेच्या हर्बेरियम उपक्रमा अंतर्गत सुबक संस्थेतर्फे हमिदाबाईची कोठी हे नाटक येत्या 26 फेब्रुवारीला रंगभूमीवर येतं आहे. या नाटकातल्या कलाकारांची नुकतीच याबाबतीत एक पत्रकार परिषद घेतली.1978 साली विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या अजरामर नाटकाला आता नव्या संचात आणि नव्या रंगात दिग्दर्शित करत आहे चंद्रकांत कुलकर्णी. विजयाताईंनी अजरामर केलेली हमिदाबाईंची भूमिका करत आहे विजयाताईंच्या शिष्या नीना कुलकर्णी. त्यांच्याबरोबर संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, स्मिता तांबे अशी या नव्या संचातील नाटकाची स्टारकास्ट आहे. सध्या या नाटकाच्या रंगीत तालमी अगदी जोरात सुरू आहेत. 'सुर्याची पिल्ले' आणि 'लहानपण देगा देवा' या नाटकांप्रमाणेच हमिदाबाईची कोठी या नाटकालाही रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी सुबक संकल्पनेचा निर्माता आणि अभिनेता सुनिल बर्वे याने यावेळी व्यक्त केला.

close