सचिन तेंडुलकर 28 रन्सवर आऊट

February 19, 2011 9:39 AM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारीवर्ल्ड कपची पहिली मॅच भारत आणि बांगलादेश दरम्यान सुरु झाली. बांगलादेशचा कॅप्टन शकीब अल हसनने टॉस जिंकून भारताला पहिली बॅटिंग दिली. सेहवाग आणि सचिनने भारताला खणखणीत ओपनिंग करुन दिली. 9व्या ओव्हरमध्येच भारताने पन्नास रनचा टप्पा पार केला. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फोर मारत सेहवागने धडाका सुरु केला. मग सचिनही मागे राहिला नाही. इस्लाम आणि हुसेनची बॉलिंग दोघांनी फोडून काढली. पण चांगल्या सुरुवातीनंतर भारताला लगेचच पहिला धक्काही बसला. सचिन तेंडुलकर 28 रन्सवर रनआऊट झाला. आता तिसर्‍या क्रमांकावर गौतम गंभीर मैदानात आला.

close