भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज

February 18, 2011 1:10 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. भाविकांसोबतच राजकीय उमेदवारांची गर्दीही यावेळच्या जत्रेला होणार आहेत. उद्या 19 फेब्रुवारीला होणा-या या यात्रेसाठी यंदा तब्बल दहा लाखाहून जास्त भाविक आंगणेवाडीला हजेरी लावतील असा आयोजकांचा अंदाज आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आंगणेवाडीची जत्रा शिवसेना आणि मनसेलाही महत्वाची वाटते. म्हणूनच भाविक हे आपले मतदारच आहेत याचं भान ठेऊन सगळ्याचे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापले जास्तीत जास्त बॅनर्स या जत्रेत कसे झळकतील याची काळजी घेतली.

close