घोडे व्यापारी हसन अलीला इनकमटॅक्सचा 40 हजार कोटी दंड

February 19, 2011 10:33 AM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारी

पुण्यातील वादग्रस्त घोडे व्यापारी हसन अली खान मुंबईत इन्कम टॅक्स विभागासमोर हजर झाला. डिसेंबर 2008 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने हसन अली-खानच्या विरोधात 40 हजार कोटी रुपये परदेशी बँकेत ठेवल्याचा ठपका ठेऊन इन्कम टॅक्स वसूल करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. हसन अली खानचा जबाब आज इन्कम टॅक्स अधिकार्‍यांनी नोंदवून घेतला. हसन अली खान याने 1999 पासून कुठलाही प्रकारचा इन्कम टॅक्स भरलेला नाही.

close