2009च्या चेन्नई ओपनमध्ये भूपती आणि पेस खेळणार

November 5, 2008 6:10 PM0 commentsViews: 3

5 नोव्हेंबर चेन्नई ,भारताची डेविस कप जोडी महेश भूपती आणि लिएंडर पेस यांनी 2009च्या चेन्नई ओपनमध्ये खेळणार असल्याचं कबूल केलं आहे. 5 जानेवारीला सुरू होणा-या स्पर्धेत हे दोघंही आपापल्या जोडीदाराबरोबर खेळतील. जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असणारे महेश भूपती आणि मार्क नॉवेल्स एकत्र खेळतील तर युएस ओपन जिंकणारी लिएंडर पेस आणि चेक रिपब्लिकचा लुकास ड्लॉ ही जोडी चेन्नई ओपनमध्ये उतरेल. चार लाख पन्नास हजार युएस डॉलरची ही स्पर्धा भारतातील एकमेव एटीपी स्पर्धा आहे.

close