सेहवागची दमदार सेंच्युरी

February 19, 2011 10:46 AM0 commentsViews: 154

19 फेब्रुवारी

वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये वीरेंद्र सेहवाग सेंच्युरीच्या वर्ल्डकप मधली पहिली सेंच्युरी ठोकली आहे. सेहवागनं आपल्या बॅटिंगची सुरुवात केली ती फोर मारत. मॅचच्या पहिल्याच बॉलवर त्यानं फोर मारला. आणि त्याच अंदाजात त्यानं हाफसेंच्युरीही ठोकली. सिक्स मारत त्यानं आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. आपल्या बॅटिंगमध्ये त्यानं 8 फोर आणि 1 सिक्स मारला आहे.

भारतीय टीमने त्यामुळे 31 ओव्हर्समध्ये 200 रनचा टप्पा पार केला. सेहवागने सचिनच्या साथीने 69 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. त्यानंतर सचिन रनआऊट झाला. गौतम गंभीरही 39 रनवर आऊट झाला. सेहवाग मात्र दुसर्‍या बाजूने फटकेबाजी करत राहिला. सचिनने 28 तर गंभीरने 39 रनकरून आऊट झाला.

close