वाळू उपसाच्या बनावट पावत्या छापणार्‍याला अटक

February 18, 2011 2:19 PM0 commentsViews: 7

18 फेब्रुवारी

बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी बनावट पावत्या छापणार्‍या सोलापुरातील वर्धमान प्रिंटींग प्रेसवर आज महसूल प्रशासन आणि पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या नावाच्या बनावट पावत्या सापडल्या. त्यामुळे या प्रकरणात राजकारण्यांचाही समावेश असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. वाळू चोरी पकडली जाऊ नये यासाठी वाळूमाफिया महसूल प्रशासनाने दिलेल्या अधिकृत पावत्यांसारख्या बनावट पावत्या बनवतात. उदय पाटील यांच्या नावाच्या बनावट पावत्या तयार केल्या जात असताना महसूल विभागानं धाड टाकली. या पावत्या उदय पाटील यांचे मित्र सनी पाटील यानं छापायला दिल्या होत्या. उदय पाटील अनेक वर्षांपासून वाळू तस्करीचा व्यवसाय करतात. केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून उदय पाटील ओळखला जातो. या प्रकरणी वर्धमान प्रेसचा मालक क्षितीज शहा याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर उदय पाटील फरार झाला आहे.

close