गगन नारंगने जिंकलं वर्ल्डकप नेमबाजीत गोल्ड मेडल

November 5, 2008 6:11 PM0 commentsViews: 4

5 नोव्हेंबर बँकॉक, भारताचा आघाडीचा नेमबाज गगन नारंगने वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धा गाजवली. त्यानं दहा मीटर एअर रायफल प्रकारात नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत गोल्ड मेडल जिंकलं. बँकॉक इथं आज झालेल्या या स्पर्धेत त्यानं एकूण 703 पूर्णांक पाच दशांश पॉइण्ट मिळवले. क्वालिफायिंग गटात त्यानं सहाशे पैकी सहाशे पॉइण्ट मिळवले तर फायनलमध्ये सातत्य कायम राखत त्यानं 103 पूर्णांक पाच दशांश पॉइण्ट पटकावले. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नारंगचा फायनलमध्ये प्रवेश थोडक्यात हुकला होता. पण या स्पर्धेत मात्र त्यानं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. आजच्या शानदार कामगिरीमुळे 2006 साली ऑस्ट्रियाच्या फार्निक थॉमसने केलेला रेकॉर्ड नारंगनं मोडला. नारंग पाठोपाठ अमेरिकेच्या मॅथ्यू इमॉन्सने सिल्व्हर तर चीनच्या त्सू किनानने ब्राँझ मेडल पटकावलं.

close