आंगणेवाडीच्या भराडी देवीला राजकीयाचं साकडं

February 19, 2011 1:50 PM0 commentsViews: 7

19 फेब्रुवारी

आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरूवात झाली आणि सकाळपासूनच लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. यावर्षी दहा लाखाहून जास्त भाविक या यात्रेला हजेरी लावतील असा अंदाज आहे. नेहमीप्रमाणेच सगळ्याच पक्षांच्या राजकीय व्यक्तींनीही आपल्या विनासंकट राजकीय कारकीर्दीसाठी भराडी देविला साकडं घातलं. भाजपाचे विनोद तावडे , शिवसेनेचे अनेक नगरसेवक, मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, राज्यमंत्री डी पी सावंत , सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे , खासदार निलेश राणे या सर्वांनीच भराडी देवीला साकडं घातलं. यावेळी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी महाराष्ट्र लवकरात लवकर माफि यामुक्त व्हावा असं साकडं घातलंय तर मनसेच्या प्रवीण दरेकरांनी आमदार म्हणून निवडून येण्यासाठी बोललेला नवस फेडला.

close