पाणी टंचाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केली तोडफोड

February 21, 2011 9:20 AM0 commentsViews: 2

21 फेब्रुवारी

औरंगबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सामानाची तोडफोड केली आहे. हॉस्पिटलमधल्या पाणी टंचाईमुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला. त्यामुळे चिडलेल्या या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहातल्या सामानांची मोडतोड केली आणि जाळपोळही केली. पाणी टंचाई आणि अस्वच्छतेसंदर्भात विद्यार्थी गेल्या दोन वर्षापासून मागणी करत होते. पण ही मागणी पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांनी दगडफेक सुरु केली.

close