मुख्यमंत्री विधानपरिषदेच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा

February 19, 2011 2:11 PM0 commentsViews: 6

19 फेब्रुवारी

मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. पण काँग्रेसकडे मात्र विधान परिषदेची एकही जागा नाही. म्हणूनच एका विद्यमान विधानपरिषद आमदाराचा राजीनामा घेऊन त्याजागी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचं नक्की केलं आहे. मुख्यमंत्र्यांना 10 मे पूर्वी विधीमंडळाचे सदस्य होणं आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीराज चव्हाण यांना किमान पाच वर्षांचा आमदारकीचा कालावधी मिळावा म्हणून विधानपरिषदेचे विद्यमान आमदार संजय दत्त यांना राजीनामा देण्यास प्रदेश काँग्रेसकडून सांगितलं जाऊ शकते. पण या व्यतिरिक्त आणखी काही पर्याय आहेत का याचीही चाचपणी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत केली जाणार आहे. याखेरीज पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्याबाहेरचा उमेदवार निवडला जाण्याची शक्यता आहे. माजी मंत्री सुरेश पचौरी यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागेवर निवड करण्याचं काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मनात असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या राज्यसभेच्या जागेवर डोळा ठेऊन असलेल्या राज्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे.

close