काळापैसा देशात आणण्यासाठी सरकार कारवाई करेल – राष्ट्रपती

February 21, 2011 9:39 AM0 commentsViews: 1

21 फेब्रुवारी

संसदेच्या बजेट अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरवात झाली. विदेशात असलेला काळापैसा देशात आणण्यासाठी सरकार कारवाई करेल असं आश्वासन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिलं. भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे देशाची प्रतिमा डागाळली आहे ती प्रतिमा सुधारण्यासाठी सर्वांनी पा्रमाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सरकार निवडणूक आणि न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल असंही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरलं होतं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी जेपीसीमार्फतच करावी या मागणीवर विरोधकांनी गोंधळ घातला होता. आता बजेट अधिवेशनात त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी कालच सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यानंतर मंगळवारी जेपीसीच्या स्थापनेचे संकेत देण्यात आले होते.

close