सुनेच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख फरार

February 19, 2011 2:37 PM0 commentsViews: 16

19 फेब्रुवारी

शिवसेनेचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड फरार आहेत. त्यांच्या सुनेचा भंडारदर्‍यात संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिच्या पालकांनी गायकवाड कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. हेमंत आणि वर्षा गायकवाड यांच्या लग्नाला अवघे नऊ महिने झालेत. गेल्या 6 महिन्यांपासून गायकवाड कुटुंब मुलीच्या पालकांकडे पैशाची मागणी करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हेमंत याचे दुसर्‍या मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध चालू राहावेत यासाठी आपल्या मुलीची हत्या केल्याची तिच्या पालकांची तक्रार आहे. राजूर पोलिसांनी याप्रकरणी गायकवाड कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर हेमंतच्या दोघा मित्रांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र दत्ता गायकवाड, हेमंत आणि त्याची आई फरार आहेत. दरम्यान, तक्रार मागे घ्यावी यासाठी मुलीच्या वडलांना धमक्याही येत आहेत.

close