जळगावमध्ये मजदूर महासंघाच्या अधिवेशनाला सुरूवात

February 19, 2011 2:47 PM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारी

भारतीय मजदूर महासंघाच्या 16 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला जळगावमध्ये सुरुवात झाली. या 3 दिवसीय अधिवेशनात भारतासह आशिया खंडातील इतर देशातील 10 हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. कामगार चळवळीतील देशातील सगळ्यात मोठी संघटना म्हणून ओळख असलेल्या भारतीय मजदूर संघटनेचं हे दर 3 वर्षांनी होणारे अधिवेशन आहे. देशाच्या सर्व राज्यातील प्रतिनिधींसह चीन, नेपाळ, अफगाणीस्तान, फिलिपाईन्स, श्रीलंका या देशातील कामगार चळवळीत काम करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींचा सक्रीय सहभाग हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कामगारांसाठी काम करणा-या इंटक, आयटक, सिटू, हिंद मजदूर सभा या संघटनेचे प्रतिनिधीही आपली भूमिका मांडणार आहेत. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पद्मश्री भवरलाल जैन यांच्या उपस्थितीत संघ प्रचार प्रमुख मदनदास यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. असंघटितांना संघटित करा हे या अधिवेशनाचं घोषवाक्य आहे.

close