टीम ऑस्ट्रेलियाची मिशन वर्ल्ड कपला सुरुवात

February 21, 2011 9:48 AM0 commentsViews: 1

21 फेब्रुवारी

सलग चौथ्यांदा वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकवण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम सज्ज झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये आज सोमवारी त्यांची मॅच असणार आहे ती झिम्बाब्वेविरूद्ध. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी ऑस्ट्रेलियानं टीममध्ये तीन फास्ट आणि एका स्पीन बॉलरला संधी दिली आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार्‍या मॅच जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन टीमचा असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्धचा विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.

close