पारधींना संरक्षण मिळावे मागणीसाठी परिषदेचं आयोजन

February 19, 2011 12:17 PM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारी

राजुलवाडीतील पोलिसांची धाड पारधी समाजावर धाक बसवून आपल्या फायादा साधण्याचाच एक डाव होता अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा साखरे यांनी केली आहे. नागपूरच्या उमरेड तालूक्यातील राजुलवाडी या गावात एक फेबु्रवारीला पोलिसांनी पन्नालाल राजपूत याच्या घरावर धाड टाकली होती. तेल माफिया म्हणून त्याला अटकही करण्यात आली. त्याच्यासोबतच या गावातील आणखी 19 महिलांनाही पोलिसांनी अटक केली. या घटनेचा निषेध म्हणून आज राजुलवाडीत काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आदिवासी पारधी स्वाभिमान परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.तसेच आदिवासी पारधींना संरक्षण मिळावे अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली.

close