अभिषेकचा ‘गेम’ सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज

February 21, 2011 10:05 AM0 commentsViews: 6

21 फेब्रुवारीफरहान अख्तरची निर्मिती असलेला गेम एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. ऍक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय कंगना राणावत, शहाना गोस्वामी आणि सारा यांच्या भूमिका आहेत. अभिषेक बच्चनच्या खेलेंगे हम जी जानसे या सिनेमानंतरचा हा यावर्षातला पहिला सिनेमा आहे. खेलेंगे हम जी जानसे या सिनेमाला प्रेक्षकांनी पाठफिरवल्यामुळे सिनेमाला हवं तितके यश प्राप्त झाले नव्हते. मात्र समिक्षकांच्या दृष्टीकोनातून सिनेमाला चांगली वाहवाह मिळाली होती. शेवट प्रेक्षकराजा अभिषेकच्या 'गेम' सिनेमाला किती पंसती देत हे सिनेमा रिलीज झाल्यावरचं खरा 'गेम' कळेल.

close