इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजसाठी सचिनला विश्रांती

November 5, 2008 6:15 PM0 commentsViews: 2

5 नोव्हेंबर नागपूर,इंग्लंड विरुध्द होणा-या सात वनडेच्या सिरीजसाठी आज भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणा-या चौथ्या टेस्टसाठी भारतीय निवड समिती सध्या नागपूरमध्ये आहे. याच ठिकाणी वनडे टीमची घोषणा करण्यात आली. या वन डे सिरीजसाठी पंधरा खेळाडूंची निवड करण्यात आली असून पहिल्या तीन वनडे मॅचसाठी ही निवड करण्यात आली आहे. टीममध्ये सेहवाग, मोहम्मद कैफ परतले असून अमित मिश्रालाही संधी देण्यात आली आहे. तर सचिनला विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड विरुध्दची पहिली वनडे येत्या चौदा नोव्हेंबरला राजकोटमध्ये, दुसरी इंदौरमध्ये तर तिसरी वन डे कानपूर इथं खेळवली जाणार आहे.

close