नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राला 32 गोल्ड

February 19, 2011 3:28 PM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कपबरोबरच 34वे नॅशनल गेम्स झारखंडमध्ये रांची इथं सुरु आहेत. आणि महाराष्ट्राच्या टीमने सहाव्या दिवस अखेर मेडल टॅलीतील आपली आघाडी कायम राखलीय. सेनादल आणि महाराष्ट्र यांच्यात आतापर्यंत काटे की टक्कर होती. पण स्विमिंगमध्ये विरधवल खाडेने दोन मेडल मिळवून महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रिचा मिश्रानेही दोन गोल्ड मिळवली. शिवाय तेजस्विनी सावंतनेही नेमबाजीत गोल्डची कमाई केली आहे. बॅडमिंटनमध्ये माजी नॅशनल चॅम्पियन सायली गोखले फायनलमध्ये पोहोचलीय. सहाव्या दिवस अखेर महाराष्ट्र 32 गोल्ड मेडलसह एकुण 94 मेडल जिंकत क्रमांक एकचं स्थान कायम राखले आहे. तर सेनादल 30 गोल्डमेडलसह एकुण 77 मेडल जिंकत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

close