पत्रकारांवर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना अटक

February 21, 2011 1:03 PM0 commentsViews: 6

21 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्हातील कर्जत तालुक्यातील नागलवाडी इथं वाळू माफियांचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणा-यांना कर्जत पोलिसांनी अटक केली. प्रदिप बबन सुर्वेकर आणि जालीदार मोहरकर यांनी चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला केला होता. तसsच त्यांचा कॅमेराही फोडला होता. या दोघांनाही कर्जत पोलिसांनी अटक करुन त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या गुन्हातील मुख्य आरोपी सतीश शिंदे आणि पोपट शिंदे हे आरोपी अजूनही फरार आहेत.

close