लवासाच्या कामगारांची उपासमार ; काम सुरू करण्याची मागणी

February 21, 2011 1:07 PM0 commentsViews: 1

21 फेब्रुवारी

'लवासा' प्रकल्पाचं बंद पडलेलं काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी लवासा समर्थक शेतकर्‍यांनी पुणे जिल्हा कार्यालयासमोर धरणे धरली होती. पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला 'काम थांबवा' असे आदेश दिले होते त्यानुसार या प्रकल्पाचं काम मागच्या दोन महिन्यापासून बंद आहे त्यामुळे या प्रकल्पावर काम करणार्‍या हजारो कामगारांची उपासमार होत आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांचा विकास होत असताना प्रकल्पाच काम बंद पडल्याने सगळ्यांचंच नुकसान होत असल्याचं या आंदोलकांच म्हणणं आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज ही निदर्शन केली.

close