जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या केरोसीन अध्यक्षांची चौकशी

February 21, 2011 4:17 PM0 commentsViews: 13

21 फेब्रुवारी

जळगाव रॉकेल काळाबाजार प्रकरण दिलीप सिखवाल आणि दिलीप मराठे यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. हे दोघेही जळगाव जिल्हातील प्रस्थापित रॉकेल वितरक आहेत. दिलीप सिखवाल हे राष्ट्रवादीचे केरोसीन आघाडीचे महानगर अध्यक्ष आहेत. पुरवठा विभागाने 2 दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत केरोसीनचा खुला काळाबाजार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पकडलेल्या एक आरोपी योगेश जैन याने हा काळाबाजारात विक्रीला जाणारा माल मी दिलीप सिखवाल आणि दिलीप मराठे यांच्याकडून घेतल्याची कबूली दिली आहे. सिखवाल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरोसीन आघाडीचे महानगराध्यक्ष असल्याने पोलिसांची भूमिका हि अत्यंत महत्वाची ठरणार अशी चिन्ह दिसत आहे. दरम्यान पोलिसांना सहकार्य करण्याची भाषा सिखवाल करत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर नेहमी सोबत असणा-यांची सलग 5 तास झाले शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. कोणत्याही बड्या नेत्यानं हस्तक्षेप केला तरी आपलं काम पूर्ण करणार या भूमिकेवर पोलीसही ठाम आहेत.

close