राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची 101 पदकाची कमाई

February 21, 2011 4:34 PM0 commentsViews: 7

21 फेब्रुवारी

महाराष्ट्राने झारखंडमधील रांची येथे सुरू असलेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मेडलची सेंच्युरी ठोकली. महाराष्ट्राने 32 गोल्डसह एकुण 101 मेडल जिंकली आहेत. पण सेनादलाने मात्र मेडल टॅलीमध्ये आघाडी घेतली आहे. 37 गोल्ड मेडलसह एकुण 90 मेडलची कमाई करीत त्यांनी महाराष्ट्राला दुसर्‍या क्रमांकावर ढकललं आहे. महाराष्ट्राच्या राही सरनौबतनं शुटींगमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली. सेनादल 37 गोल्डमेडलसह पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र 32 मेडलसह दुसर्‍या क्रमांकावर आहे तर मणीपूरनं 27 मेडलसह तिसर्‍या क्रमांकावर झेप घेत दिल्लीला मेडल टॅलीमध्ये चौथ्या क्रमांकावर ढकललं आहे.

close