ओबामांचा पुढचा प्रवास खडतर

November 6, 2008 4:48 AM0 commentsViews: 4

6 नोव्हेंबर, अमेरिकाअमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून ओबामा यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पण, यांचा यापुढचा प्रवास आता कठीण असण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या अर्थव्यवस्था खूपच बिकट बनलीय. अशा वेळेस ओबामा अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत. कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्याचं अवघड आव्हान त्यांच्यापुढं आहे. शिवाय इराक आणि अफगाणिस्तानातल्या युद्धाचा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. लवकरच आपल्या कामाला सुरवात करण्याची आणि आपल्या टीमची निवड करण्याची ओबामांची इच्छा आहे. त्यांची नावं सुचवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

close