युएलसी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे

February 22, 2011 10:09 AM0 commentsViews:

22 फेब्रुवारीपुण्यातल्या युएलसी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. हायकोर्टानं या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या घोटाळ्यातली 29 प्रकरणे सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात आली. सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले. दोषी महसूल अधिकारी आणि तत्कालिन राज्यमंत्री राज पुरोहित यांच्या विरोधात सहा आठवड्याच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठ आठवड्याच्या आत सीबीआयला याप्रकरणी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, याविरोधात राज पुरोहित सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

close