फीनियंत्रणा मसुद्यावर हरकत नोंदवा 4 मार्चपर्यंत

February 21, 2011 4:49 PM0 commentsViews: 2

21 फेब्रुवारी

शाळेतील फी वाढ रोखण्याकरता करण्यात येणार्‍या कायद्याचा मसुदा जाहीर करून सरकारनं एक पाऊल पुढं टाकलं असलं तरी या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा करत त्याला विरोधही होतोय. सरकारने या मसुद्यावर हरकती मागवल्या आहे. मात्र अनेक पालकांचं आणि विरोधकांच्या म्हणणं आहे की हा वेळ कमी पडत आहे. यासाठी राज्यभरात आंदोलन होत आहे. दरम्यान फीनियंत्रणाचा कायद्याविषयी सूचना, प्रतिक्रिया नोंदवण्यासाठीची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. 4 मार्चपर्यंत आपल्या हरकती नोंदवता येणार आहे. शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर हा मसुदा उपलब्ध आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली आहे.

शिक्षण संचालकांकडे हरकती सुपूर्द

पुण्यात काही शाळांमधील पालकांनी मोर्चाद्वारे शिक्षण संचालकांकडे त्यांच्या हरकती सुपूर्द केल्या. महागडी फी आकारत असणार्‍या शाळांमधे असलेला पायाभूत सुविदांचा अभाव. जास्त फी वाढ असल्यास पालकसंघा ऐवजी प्रत्येक पालकाला या विरोधात आवाज उठवता यावा या आणि इतर मागण्या आणि हरकती पालकांनी मांडल्या आहेत. रोजरी, स्प्रिंगडेल, क्रिसेंट या शाळांमधील शेकडो पालक या मोर्चात सामील झाले होते.

close