स्पेक्ट्रम घोटाळ्यासाठी जेपीसीची घोषणा

February 22, 2011 10:49 AM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी

बजेट अधिवेशनाच्या सुरुवातीलाच 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जेपीसीची घोषणा केली. 2 जी स्पेक्ट्रम प्रमाणेच आदर्श आणि कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जेपीसीची स्थापना करावी या मागणीसाठी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात गोंधळ घातला होता आणि कामकाज होऊ दिलं नव्हते. बजेट अधिवेशनात त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच जेपीसीच्या स्थापनेचा सरकारनं निर्णय घेतला.जेपीसी चौकशी फक्त 2-जी प्रकरणीच होणार आहे हे ही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं आहे.

close