सचिनच्या घरासाठी नाकर्तेपणा लाजीरवाणा -राज ठाकरे

February 22, 2011 12:11 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारी

सचिन तेंडुलकरला आपल्या नव्या घरी जिम बांधण्यास महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास खात्यानं वाढीव एफएसआय नाकारणे हा लाजीरवाणा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. आज एका पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांना स्वच्छ कारभार करायचा असेल तर त्यांना मुंबईत अनेक गैरकारभार दाखवू असंही म्हटलं आहे. मुंबईत बाहेरून जे आले आहे त्यांना फुकट घरं मिळतात उत्तर भारतीयांची घरं अनधिकृत असली तरी ती अधिकृत होतात. पण सचिनला मात्र एफएसआय मिळत नाही . त्यामुळे सचिनच्या जिमसाठी एफएसआय नाकारणे म्हणजे मराठी माणसावर अन्याय आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहे. त्याचबरोबर पाकच्या खेळाडूंना विरोध कसा करता येईल असा सवाल करत वानखेडेवरच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडुंना विरोध करणार नसल्याचंही राज यांनी सांगितले.

सचिन तेंडुलकरसाठी मुंबईतील बांद्रा परिसरातील पेरी क्रॉस रोड इथं चार मजली इमारत तयार होत आहे. इमारतीचे काम करणार्‍या आर्किटेक्टचर कंपनीने नगरविकास खात्याकडे इमारतीच्या जिम साठी वाढीव एफएसआय मागणी केली होती. सचिन तेंडुलकरचं आपल्या नव्या घरी जिम असावे असे स्वप्न आहे. पण नगरविकास खात्याच्या या आदेशामुळे सचिनचं स्वप्न आता फक्त स्वप्नच राहणार आहे.

close