मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी एका लष्करी अधिकार्‍याला पोलीस कोठडी

November 6, 2008 4:51 AM0 commentsViews: 4

4 नोव्हेंबर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी, अटक करण्यात आलेल्या प्रसाद पुरोहितला एटीएसनं 15 तारखेपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रसाद लेफ्टनंट कर्नल आहेत. पुरोहितला बुधवारी साडेअकरा वाजता संरक्षण मंत्रालयाने एटीएसच्या हवाली केलं. नंतर एटीएसनं त्याला कोर्टात हजर केलं. मालेगाव बॉंम्बस्फोट प्रकरणात याआधी अटक करण्यात आलेल्या रमेश उपाध्यायला पुरोहित यानं हवालामार्फत पैसा पुरवला होता. अभिनव भारत च्या अनेक बैठका काश्मीर, पुणे, अहमदाबाद आणि भोपाळ मध्ये झाल्या. या बैठकांनाही पुरोहित हजर होता. काही दिवसांपूर्वी प्रसाद पुरोहितनं या स्फोटातल्या आरोपींना, ' वुई आर ऑन द रडार ऑफ एटीएस ' असा एसएमएस पाठवला होता.

close