आऊट झाल्यानंतर पॉंटिंगनं एलसीडी फोडला

February 22, 2011 12:24 PM0 commentsViews: 4

22 फेब्रुवारी

वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली आणि मैदानातही खेळाडूंच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पॉंटिंग. झिंबाब्वेविरूद्धच्या मॅचमध्ये रिकी पॉंटिंग रन आऊट झाला आणि त्याचा स्वत:वरचा संयम सुटला. पॅव्हेलिअनमध्ये परतल्यावर रागाच्या भरात पॉंटिंगनं ड्रेसिंग रूममधला एलसीडी तोडला. रन आऊट झाल्यानंतर पॉंटिंग ड्रेसिंग रूममध्ये आला आणि लगेचच त्याने एलसीडी टीव्ही फोडून टाकला. झिंबाब्वेविरूद्धच्या मॅचमध्ये ख्रिस मॉफूने पॉण्टींगला 28 रन्सवर रन आऊट केलं होतं.

close