राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर

February 22, 2011 12:47 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारी

रांची येथे सुरू असलेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 10 व्या दिवशी सेनादलनं आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर महाराष्ट्राने आपल्या खात्यात आणखी दोन गोल्ड मेडलची भर टाकली. स्पर्धेच्या नवव्या दिवशी महाराष्ट्राच्या कविता राऊतने 5000 मीटर रेसमध्ये गतविजेत्या प्रीजा श्रीधरनला मागे टाकत गोल्ड मेडलची कमाई केली. तर बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या अरूंधती पांतवणेनं गोल्ड मेडल पटकावलं. पण महाराष्ट्राच्या बॅडमिंटन टीमला ब्राँझ मेडलवर समाधान मानावे लागले आहे. सेनादल 46 गोल्डमेडलसह पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र 34 मेडलसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. मणीपूरनं 32 मेडलसह तिसर्‍या क्रमांकावर आहे तर दिल्ली 24 गोल्डसह चौथ्या स्थानावर आहे.

close