गौरव मराठी कर्तृत्वाचा

February 22, 2011 1:14 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारी

महाराष्ट्रातल्या अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली. आज महाराष्ट्र ओळखला जातो तो अशाच कर्तृत्ववान जिगरबाज महाराष्ट्रीयन माणसांमुळे. अशाचं असामान्य महाराष्ट्रीयनांचा गौरव करण्यासाठी यंदापासून लोकमततर्फे दिले जाणार आहेत पुरस्कार आणि या पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर..

महाराष्ट्राच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ज्यांनी महाराष्ट्राचे नाव गाजवले, ज्यांनी त्याची शान वाढवली, ज्यांनी इथं प्रगती घडवून आणली, अशा महाराष्ट्राच्या असामान्य नागरिकांचा सन्मान करणार आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ऍवॉर्ड. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन यांना प्रगतीपथावर नेणार्‍यांचा हा निव्वळ सन्मान नाही तर येणार्‍या पिढीसाठी ती एक प्रेरणा ठरेल.

राजे-महाराजे, संत-कलावंत, सुधारक-समाजसेवक, या सर्वांची भूमी म्हणजे महाराष्ट्र या मातीशी ज्याचं नातं जुळलं ते खरोखरचं भाग्यवान. या भूमीशी ज्यांनी रक्ताचं आणि घामाचं नातं जोडलं, तेच महाराष्ट्रीयन. भाषा-वेशभूषा, संस्कार-संस्कृती, जात-पात या पलीकडं जाऊन ज्यांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली ते महाराष्ट्रीयन.

सन्मान मिळणार्‍याचं नाव, गाव किंवा क्षेत्र काहीही असो, पण केवळ ज्यांचं नाव घेण्यानं आपली छाती फुलते अशाच लोकांना मिळणार आहे हा लोकमतचा सन्मान ज्येष्ठ गीतकार गुलझार, लीला पुनावाला, बी.एन. देशमुख, रघुनाथ माशेलकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, आयबीएन नेटवर्कचे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई यासारखी मान्यवर मंडळी निवडतील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2010. महाराष्ट्राचा अभिमान वाढवणार्‍यांचा या हा सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे.

close