कॉपी पुरवली म्हणून डीवायएसपीने घेतला एकाचा जीव

February 22, 2011 1:58 PM0 commentsViews: 6

22 फेब्रुवारी

आज राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या. आणि पहिल्याच दिवशी एका घटनेनं गालबोट लागलं. जळगाव जिल्ह्यात आज पोलिसांच्या मारहाणीत एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक इथल्या ज्योती विद्यामंदिर शाळेत परीक्षा सुरु होत्या. कॉपी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलीसांचा पहारा होता. सुरेश चौधरी हा स्थानिक शेतकरी शाळेजवळ असलेल्या आपल्या शेताजवळ उभा होता. पण तो कॉपी पुरवण्यासाठी शाळेजवळ आल्याचा संशय डीवायएसपींना आला. या संशयावरुन दिलीप शंकरवार यांनी ही बेदम मारहाण केली. यात चौधरी यांचा मृत्यू झाला. डीवायएसपी दिलीप शंकरवार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पोलीस अधीक्षक चंद्रकांत कुंभार यावलमधे दाखल झाले आहेत. दंगलनियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या आणि आजूबाजूच्या परिसरातील सात तालुक्यातील पोलीस कुमक यावलमधे दाखल झाली आहे. संतप्त जमावाने यावल पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यात पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष आलवे, पोलीस कॉन्स्टेबल कालिदास गायकवाड जमावाच्या दगडफेकीत जखमी झाले. पोलिसांच्या चार गाड्या आणि तहसीलदारांच्या सरकारी गाडीचं नुकसान झालं आहे. यावलचे माजी नगराध्यक्ष दिपक बेहेडे यांची गाडीदेखील संतप्त जमावाने पेटवली.

close