मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नेमाडे आणि हेगडे यांचा सन्मान

February 22, 2011 2:21 PM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी

राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त डॉ. भालचंद्र नेमाडे आणि लोकशाहीर लीलाधर हेगडे यांचा नुकताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 50 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप होतं. त्याचबरोबर यावेळी रा.रं. बोराडे, अनिल अवचट, भास्कर चंदनशिव, वसंत आबाजी डहाके, तारा भवाळकर, आशा बगे यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, डॉ.विजया वाड, आनंद कुलकर्णी हेही उपस्थित होते.

close