पुणे महापालिकेच बजेट सादर

February 22, 2011 3:46 PM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज आगामी वर्षाचं 3 हजार 247 कोटीच बजेट सादर केलं आहे. आयुक्तांनी सुचवलेल्या 2 हजार 984 कोटीच्या बजेटमधे 263 कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे. पुढचे वर्ष हे महानगरपालिका निवडणुकाचं असल्यानं कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. सोन्या चांदीव्यतिरीक्त इतर कुठल्याही वस्तूवर जकात वाढवलेली नाही. स्थायी समीती अध्यक्षांनी कोणतही कर्ज न काढता तसेच करवाढ न करता बजेट मांडल्याचं सांगत स्वत:ची पाठ थोपटली आहे. तर विरोधकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन फसवे बजेट मांडल्याची टीका केली आहे.

बजेटमधल्या विशेष तरतुदी

-पुण्यात इंदिरा गांधींच्या नावाने सुरू करण्यात येणार्‍या मेडिकल कॉलेजकरता 9 कोटी- शालेय मुलांसाठी 50 हजार मोफत सायकलींसाठी 4 कोटी- सीएनजीवरील रिक्षांकरता 75 टक्के अनुदान, पीएमपी बसेसकरता 25 कोटी- मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी 21 कोटी रूपयांची तरतूद ही या बजेटची ठळक वैशिष्ट्य आहेत. पुणे मॅरेथॉन करता बजेटमधे 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहेत.

close