जमिनीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

February 22, 2011 3:53 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारी

महाराष्ट्र सरकारने 30 वर्षापूर्वी शेतकर्‍यांच्या जमिनी औद्योगिक वापरासाठी शेतकर्‍यांकडून घेऊन उद्योगधंद्यांना दिल्या मात्र आता उद्योग धंदे बंद झाल्यावर त्या जमिनी विकासकांना दिल्या जात आहेत याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील शेतक-यांनी बायर इंडिया या कंपनीवर मोर्चा काढला. शेतक-यांनी औद्योगिक विकासाकरता जमिनी दिल्या मात्र प्रत्यक्षात उद्योग धंदे बंद झाल्यावर ह्या जमिनी विकासकांना दिल्या जातात आणि शेतक-यांची फसवणुक होते याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यातील किसान क्रांती संघटना यांनी बायर इंडिया या कंपनीवर मोर्चा काढला. मुळ जमीन मालकांना परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

close