अभंगनाद कार्यक्रमाची गिनीज बुकात नोंद

February 22, 2011 3:56 PM0 commentsViews: 8

22 फेब्रुवारी

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने कोल्हापुरात आयोजित केलेल्या अभंगनाद या कार्यक्रमांची गिनीजबुकात नोंद करण्यात आली आहे. टाळ मृदंग आणि खांद्यावर वीणा घेऊन 2 हजार दोनशे वारकर्‍यांनी आणि 1353 धनगरी ढोलधार्‍यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. स्त्री भृणहत्या रोखण्यासाठी हा उपक्रम समर्पित करण्यात आला होता. शिवाजी मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येत लोक हजर होते. जीवन चैतन्यमय बनवण्यासाठी ज्ञान, गायन, ध्यानाची गरज असल्याच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री. श्री. रविशंकर यांनी यावेळी सांगितले.

close