इंग्लंडचा नवख्या हॉलंडवर विजय

February 22, 2011 5:55 PM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी

इंग्लंड आणि नेदरलंड यांच्यातलं फुटबॉलमधलं वैर सगळ्यानाच माहित आहे. पण आज क्रिकेटच्या मैदानावरही हॉलंडने इंग्लंडला जोरदार टक्कर दिली. अखेर इंग्लंडने 6 विकेट राखून विजय मिळवला. पण हा विजय त्यांच्यासाठी सोपा मात्र नव्हता. आधी पहिली बॅटिंग करत हॉलंडने 292 रनचा स्कोअर उभा केला. आणि दुसर्‍या इनिंगमध्ये इंग्लंडला 49 व्या ओव्हरपर्यंत झुंजवलं. इंग्लंडचा कॅप्टन अँड्र्यू स्ट्राऊसने 88 तर जोनाथन ट्रॉटने 62 रन केले. कॉलिंगवूड आणि रवि बोपारा यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. पण या मॅचचा हिरो ठरला तो रायन डॉचट्. हॉलंड तर्फे टेस्ट टीमविरुद�ध पहिली सेंच्युरी ठोकण्याचा मान त्याने मिळवला. तर ऑलराऊंड कामगिरी करत 47 रनमध्ये 2 विकेटही त्याने घेतल्या आहेत.

close