कलमाडींभोवतीचा फास आवळला ; भानोत,वर्मांना अटक

February 23, 2011 9:56 AM0 commentsViews: 2

23 फेब्रवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींभोवतीचा फास आता आणखी आवळण्यात आला आहे. कलमाडींचे जवळचे सहकारी ललित भानोत आणि व्ही के वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची आज सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ललित भानोत यांना कलम 120 बी म्हणजे गुन्हेगारी कट रचणे आणि कलम 420 म्हणजे फसवणुक करणे यानुसार केली अटक आहे. काही दिवसांपूर्वी कलमाडींचे पीए देवरूखकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एकएक करून कलमाडींचे निकटवर्तीयांना अटक सत्र घडत आहे आता पुढचा नंबर कलमाडींचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

close