शिवसेनेचे आमदार दादा भुसेंची आमदारकी रद्द

February 23, 2011 10:38 AM0 commentsViews: 8

23 फेब्रवारी

शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांची आमदारकी रद्द करण्याचा आदेश हायकोर्टानं दिला आहे. गुन्हयांची माहिती योग्यप्रकारे दिली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. ही याचिका अर्जुन भुसे यांनी दाखल केली होती. अर्जुन भुसे हे दादा भुसे यांचे विधानसभा निवडणुकीतले प्रतिस्पर्धी होते.डिसेंबर 2009 मधे ही याचिका दाखल झाली होती. या निर्णयाविरोधात भुसे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. भुसे यांच्याविरोधात 21 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये मारहाण, खून आणि दंगल घडवणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याला मारहाण केली. होती. 2002 च्या मालेगाव दंगलीमध्ये सईद अन्सारी नावाच्या हत्या करण्यात आली होती. या खटल्यात दादा भुसे यांची निर्दोष मुक्तता झाली होती. पण या खटल्याची माहितीही त्यांनी दडवून ठेवली.

close