जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांचं निधन

February 23, 2011 12:16 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी

जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांचं निधन झालं आहे. जनसंघाच्या संस्थापकांपैकी सुमतीताई एक होत्या. त्या 86 वर्षांच्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींपासून, भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सुमतीताईंच्या तालमीत घडले.1939 पासून त्यांनी स्वत: ला राष्ट्रीय कार्यात झोकून दिलं होतं. आणिबाणीच्या काळात त्यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या पार्थिवावर आज नागपूरच्या अंबाझरी स्मशानात भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

close