अफजल गुरूच्या फाशीवरून जोशी, चिदबंरम यांच्यात खडाजंगी

February 23, 2011 11:20 AM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारी

राज्यसभेत आज शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी आणि गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्यात खडाजंगी झाली. संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू यांच्या फाशीबाबत सरकार काहीच निर्णय घेत नसल्याची टीका जोशी यांनी केली. अफझल गुरू अल्पसंख्याक असल्याने सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप जोशी यांनी केला. यावर चिदंबरम यांनी जोरदार आक्षेप घेतला. जोशी यांचं हे विधान असंसदीय असल्याचं ते म्हणाले. अफझल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेबाबत गृह मंत्रालयाने वेळोवेळी सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत.त्यामुळे त्याच्या शिक्षेला होत असलेल्या वेळेला गृहमंत्रालय जबाबदार नाही असंही ते म्हणाले. अफझल गुरू याच्या दयेच्या अर्जावर आता राष्ट्रपती निर्णय घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.

close