वर्ल्डकपची वेबसाइट कोडमडली

February 23, 2011 1:04 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी

वर्ल्ड कपच्या फायनलसाठी ऑनलाईन तिकीट विक्री सुरु करण्यात आली पण एकाच वेळी हजारो क्रिकेटप्रेमींनी ऑनलाईन तिकीट मिळवण्यासाठी गर्दी केल्यानं ही साईटच क्रॅश झाली. त्यामुळे एकही तिकीट विकलं गेलं नाही. वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 33 हजार असली तरी सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी फक्त 3 हजार तिकीटच उपलब्ध आहेत. यातल्या एक हजार तिकीटांची ऑनलाईन विक्री केली जाणार आहे. त्यामुळे आता ऑनलाईन ड्रॉ पध्दत वापरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे व कसा भरायचा हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण ड्रॉ जिंकणार्‍या व्यक्तींना ऑनलाईनच तिकीट खरेदी करावी लागतील. आणि एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोनच तिकीट मिळतील असंही आयसीसीने जाहीर केलं आहे.

close