फार काही नको..फक्त रोजचा प्रवास सुखकर करा !

February 23, 2011 2:10 PM0 commentsViews: 9

गोविंद तुपे, मुंबई

23 फेब्रुवारी

मुंबईच्या लोकलमधून दररोज जवळपास 70 लाख लोक प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास सुखद होण्यासाठी रेल्वेनं काही मूलभूत सेवा सुविधा पुरविल्या पाहिजेत आणि गाड्यांची संख्या वाढवाली पाहिजे अशा माफक अपेक्षा येण्यार्‍या रेल्वे बजेट मधून मुंबईकर व्यक्त करत आहेत.

मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल आणि याच लोकल मधून दररोज गर्दीत रेटून लाखोप्रवासी प्रवास करतात. दिवसेंदिवस रेल्वे प्रवास्याची गर्दी पाहता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या वर्षीच्या बजेट मध्ये 109 लोकल नवीन सोडण्यातआल्या.

यात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्दीला तातपुरता इलाज म्हणून मध्य रेल्वेवरील सर्व 9 डब्ब्याच्या लोकल 12 डब्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु अद्याप पर्यंत 50 लोकल अजुनही 9 डब्याच्या असल्याच रेल्वे अधिकारी सांगताहेत. त्यामुळे रेल्वेचा त्रासदायक प्रवास आहे तसाच आहे.

गेल्या पाच वर्षात रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडल्या प्रवास्यांची संख्या लक्षात घेता रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्यरेल्वेवर 10 फूट ओवर ब्रिज बांधण्याची घोषणाही गेल्या वर्षीच्या बजेट मध्ये झाली त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला पण त्यातल्या जवळपास 7 ब्रिजच्या कामाचा अजून शुभारंभही झाले नाही.

एकंदरीतच काय तर गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये ज्या घोषण्या करण्यात आल्या त्यातील काही तुटपुंज्या गोष्टी सोडण्यात बाकी सर्व घोषणा कागदावरच राहीलेल्या दिसता. त्यामुळे दररोज जीव मुठीत घेवून लोकल मधुन प्रवास करणार्‍या प्रवास्याच्या पदरात या वर्षी तरी काही पडणार काय हे बघाव लागेल.

close