मराठवाड्यात अद्यापही रेल्वे ‘लेटच’ !

February 23, 2011 2:34 PM0 commentsViews: 12

संजय वरकड, औरंगाबाद

23 फेब्रुवारी

येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला देशाचं रेल्वे बजेट सादर होणार आहे. पण आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये रेल्वेची सगळ्यात कमी कामं झाली ती मराठवाड्यामध्ये. अनेक मार्ग प्रस्तावित असले तरी ते पूर्ण होण्यासाठीची आवश्यक तरतूद नाही. शिवाय वेगवेगळ्या वादांमुळेही रेल्वेमार्ग रखडलेले आहेत.

मराठवाड्यातील रेल्वेमार्गांच्या महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. काही मार्ग मंजूर झालेले आहेत, पण त्यासाठी तरतूदच केली जात नाही. त्यामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पात मराठवाडा फक्त कागदावरच दिसतो. प्रत्यक्षात तरतूद नसल्यामुळे कामच होत नाहीत.

नांदेडमधल्या गुरूता गद्दी सोहळ्यामुळे नांदेड – बीदर हा रेल्वे मार्ग मागणी नसतानाही मंजूर झाला. पण तो नायगाव मार्गे बीदरला जोडायचा की लातूरमार्गे जोडायचा यावरून वाद सुरू आहे. हा मार्ग नायगाव देगलूरमार्गाऐवजी लोहा, अहमदपूर, चाकूर, लातूरमार्गे बीदरला जोडण्याची मागणी शिवेसेनेन केली. त्यामुळs तरतदू झाली तरी या मार्गे पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. मराठवाड्यातल्या आणखीही अनेक मागण्या रखडलेल्या आहेत.

मराठवाड्याच्या अपेक्षा

- अहमदनगर बीड परळी या मंजूर रेल्वे मार्गासाठी तरतूद हवी- पूर्णा अकोला तरतूद हवी – सोलापूर अकोला मार्गासाठी तरतूद करण्याची मागणी- सोलापूर औरंगाबाद जळगाव हा मंजूर रेल्वे मार्ग तरतुदी अभावी रखडला आहे- वेरूळ अजिंठा पैठण तसेच खुलताबाद रोटेगावसाठी रेल्वे मार्गाची मागणी – निजामाबाद बोदन बिदरपासून देगरलूर, मुखेड उदगीर असा रेल्वे मार्ग करावा- याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गांवर काही नव्या रेल्वे सुरू करण्याचीही मागणी आहे.

मराठवाड्यातील मंजूर रेल्वेमार्गाला यावर्षीतरी निधी मिळतो की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

close