कलमाडींना पुढच्या आठवड्यात अटक ?

February 23, 2011 2:45 PM0 commentsViews: 7

23 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींभोवतीचा फास आता आणखी आवळण्यात आला. कलमाडींचे जवळचे सहकारी ललित भानोत आणि व्ही के वर्मा यांना अटक करण्यात आली. दोघांची आज सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली. 107 कोटी रुपयांच्या टायमर घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. कॉमनवेल्थ खेळांदरम्यान लागणारी घड्याळं आणि टायमर्स चढ्या दरानं विकत घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कलम 120 बी म्हणजे गुन्हेगारी कट रचणे आणि कलम 420 म्हणजे फसवणुक करणे. या दोन कलमाअंतर्गत त्यांच्यावर कारवाई कऱण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश कलमाडींना पुढच्या आठवड्यात अटक होणार होण्याची शक्यता आहे.

- रांचीत सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळांनंतर त्यांना अटक होईल- 600 कोटी रुपयांच्या कॉमनवेल्थ ओव्हरलेज घोटाळ्यात अटक होईल- कलमाडींविरुद्ध लवकरच एफआयआर दाखल करण्यात येणार आहे- क्वीन्स बॅटन रिले आणि टायमर घोटाळ्यातही त्यांच्या भूमिकेचा तपास सुरू- शुंगलू समितीने यापूर्वीच कलमाडींवर कॉमनवेल्थ केटरिंग घोटाळ्यात ठपका ठेवला- याआधी कलमाडींचे सहकारी ललित भानोत यांना अटक झाली.

कोण आहेत ललित भानोत ?

ललित भानोत हे कलमाडींचे सेनापती मानले जातात. आणि म्हणूनच कॉमनवेल्थ गेम्सचं जनरल सेक्रेटरी हे अत्यंत महत्वाचं पद कलमाडींनी भानोत यांना दिलं होतं. ललित भानोत हे भारतीय ऍथलेटिक्स संघटनेचे जनरल सेक्रेटरीही होते. कलमाडींचे ऍथलेटिक्समधील हित सांभाळण्याची कामगिरी भानोत इमाने इतबारे करीत होते. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील टॉयलेटच्या दुरावस्थेवर भानोत यांनीही 'इंडियन स्टँडर्ड' स्वच्छता असल्याची दिलेली प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली होती.

कोण आहेत व्ही. के. वर्मा ?

व्ही के वर्मा हे आजही भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आहेत. कॉमनवेल्थमधील बॅडमिंटन कोर्टाच्या उभारणीचं कंत्राट आपल्याच मुलाच्या कंपनीला दिल्यानं ते अडचणीत आले होते. प्रकाश पडुकोण यांनी वर्मायांच्याविरुध्द केलेल्या बंडात कलमाडी वर्मा यांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते.

close