नीलम गोर्‍हे आणि नार्वेकरांचे आवाजाचे नमुने घेणार

February 23, 2011 3:02 PM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारी

नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने आता पोलीस घेऊ शकणार आहेत. दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणावरुन शिवसेनेने पुण्यामध्ये बंद पुकारला होता. त्या बंदच्या आदल्या रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांच्या मधलं संभाषण पोलिसांनी टॅप केलं होतं. या संभाषणामध्ये पुणे बंदच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जाळपोळ करण्याबद्दल आणि हिंसक आंदोलन करण्याबद्‌द्लचं संभाषण टॅपिंग केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर नार्वेकर आणि गोर्‍हे यांना अटक करुन जामीनावर त्यांची सुटका झाली होती. यापकरणी पुढील तपासासाठी त्या दोघांच्याही आवाजाचे नमुने घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज केला होता. आणि आज पुण्यातल्या शिवाजी नगर कोर्टाने आवाजाचे नमुने घ्यायला परवानगी दिली.

close