पाकिस्तानचा केनियावर सहज विजय

February 23, 2011 4:46 PM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान टीमनं केनियाचा 205 रन्सनं पराभव करत विजयी सलामी दिली. पाकिस्ताननं केनियासमोर विजयासाठी 318 रन्सचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. पण केनियाची टीम केवळ 112 रन्समध्येच ऑलआऊट झाली. कॉलिन्स ओबूयानं एकाकी झुंज देत 47 रन्स केले. पण पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगसमोर इतर बॅट्समन फार काळ टीकले नाहीत. कॅप्टन शाहिद आफ्रिदने अवघ्या 16 रन्समध्ये 5 विकेट घेतल्या. त्याआधी उमर अकमलने 71 तर मिसबाह उल हकनं 65 रन्स करत पाकिस्तानला बलाढ्य स्कोर उभा करुन दिला.आता दिल्लीत उद्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन तगड्या टीममध्ये मुकाबला रंगणार आहे.

close