ठाण्यातील थिएटर्स 27 फेब्रुवारीपासून चार दिवस बंद

February 23, 2011 5:03 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी

थिएटर्समध्ये पर्यावरण जागरूकतेची फिल्म दाखवली जात नसल्याच्या कारणावरून ठाणे जिल्ह्यातील सात सिनेमा थिएटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. ही थिएटर्स चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. 27 फेब्रुवारीपासून ही थिएटर्स चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यात ठाण्यातील सिनेवंडर, गणेश टॉकीज, इटर्निटी मॉलमधील सिनेमॅक्स आनंद सिनेमा तसेच कल्याणमधील छाया थिएटर आणि भिवंडीतील आशिष टॉकीज यांचा समावेश आहे.

close