पुण्यात कचरामुक्तीच्या उपक्रमाला सुरूवात

February 23, 2011 5:06 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी

पुणे महानगरपालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया आणि महाराष्ट्र प्लॅस्टीक असोसिएशन यांनी मिळून निर्मळ कात्रज- देखणं कात्रज हा कचरामुक्तीचा उपक्रम आज सुरू केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून वॉर्डातल्या कचर्‍याची वॉर्डातच विल्हेवाट लावण्याचा हा पुण्यातला प्रथमदर्शी प्रकल्प आहे.संत गाडगेबाबांच्या जन्मदिनी याचं महापौरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. पुण्याचा सर्व कचरा आत्तापर्यंत उरळी देवाची- फुरसुंगी या कचरा डेपोत टाकण्यात येत होता पण आता ओपन डंपींग बंद करण्यात आलं आहे. या नव्या प्रकल्पानुसार स्वच्छ या संघटनेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन ओला- सुका कचरा गोळा करणार आहेत. त्याकरता त्यांना गाड्या पुरवण्यात आल्या आहेत.

close